Babar Azam’s poor form continues in T20 cricket comeback match
esakal
Babar Azam’s poor form continues in T20 cricket comeback match : बाबर आझम ट्वेंटी-२० संघात परतला.. आता तो धावांचा पाऊस पाडून टीकाकारांची बोलती बंद करेल.. अशी स्वप्न घेऊन मोठ्या संख्येने पाकिस्तानी चाहते स्टेडियमवर उपस्थित होते. पण, बाबरचा खराब फॉर्म कायम राहिला. १० महिन्यानंतर ट्वेंटी-२० संघात परतलेला बाबर दोन चेंडूंत शून्य धावेवर झेलबाद झाला. बाद होण्यापूर्वी तो रन आऊट होता होता वाचला, तर क्षेत्ररक्षणात त्याने झेलही टाकला. त्यामुळे पाकिस्तानी चाहते आणखी निराश झाले..