
पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तिरंगी वनडे मालिकेतील सामना बुधवारी खेळला जात आहे. कराचीमध्ये हा सामना होत असून पहिल्याच डावात मोठा राडा झाल्याचे दिसून आले. दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना भिडले होते.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण शाहिन आफ्रिदीने सलामीवीर टोनी डी झोर्झी याला २२ धावांवरच बाद केले. पण त्यानंतर कर्णधार तेंबा बवुमाने मॅथ्यू ब्रित्झकेसोबत फलंदाजी करताना डाव सावरला.