Pakistan team finally arrives at the Dubai International Stadium
esakal
Pakistan vs United Arab Emirates Live Marathi Update : भारतीय संघाने केलेला अपमान पुरेसा नव्हता म्हणून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नौटंकी केली आणि त्यांची जगासमोर लाज गेली. भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन केले नाही म्हणून PAK vs UAE लढतीवर बहिष्कार घालण्याची भाषा मवाळ करावी लागली. जय शाह अध्यक्ष असलेली आयसीसी आपल्या मागणीला भीक घालत नाही, हे कळताच पाकिस्तानी खेळाडू गपगुमान मैदानावर खेळायला आले. PCB चे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ट्विट करून अशी माहिती दिली. एक तास उशीराने हा सामना सुरू झाला आणि यूएईने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.