T20 World Cup: 'भारताविरुद्ध न खेळण्याचा निर्णय सरकारचा, आमच्या हातात...' पाकिस्तानचा कर्णधार काय म्हणाला?

Pakistan Captain Salman Agha on India Match Boycott: टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये पाकिस्तानने भारताविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आज झालेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानचे कर्णधार सलामान आघाला प्रश्न विचारण्यात आला होता.
Salman Agha on IND vs PAK

Salman Agha on IND vs PAK

Sakal

Updated on

Pakistan Captain Salman Agha on India Match Boycott: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच काही वाद पाहायला मिळाले. ही स्पर्धा भारत आणि श्रीलंकेत ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मात्र काही दिवसांपूर्वी बांगलादेशेने सुरक्षेचं कारण सांगत भारतात स्पर्धेसाठी जाणार नसल्याचे सांगत ठिकाण बदलण्याची मागणी केली होती.

मात्र आयसीसीसोबतच्या (ICC) अनेक चर्चांनंतरही तोडगा न निघाल्याने त्यांना स्पर्धेतून बाहेर करण्यात आले आणि स्कॉटलंडला संधी देण्यात आली. मात्र, याप्रकरणात पाकिस्तानने उघडपणे बांगलादेशला पाठिंबा दिला. त्यांनीही स्पर्धेवर बहिष्काराचा विचार केला होता.

मात्र पाकिस्तान सरकारने रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान संघाला टी२० वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) श्रीलंकेत जाण्याची परवानगी दिली, मात्र १५ फेब्रुवारीला कोलंबोत भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकण्यास सांगितले आहे. त्यामुळे आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) कारवाईचा इशाराही दिला.

मात्र पाकिस्तान त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसत आहे. यावर आता पाकिस्तान संघाचा कर्णधार सलामान आघाने (Salman Agha) भाष्य केले आहे.

<div class="paragraphs"><p>Salman Agha on IND vs PAK</p></div>
Suryakumar Yadav: आमचं तिकीट बुक झालंय... भारत - पाकिस्तान सामन्याच्या वादावर सूर्यकुमारने स्पष्टच बोलला
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com