Suryakumar Yadav: आमचं तिकीट बुक झालंय... भारत - पाकिस्तान सामन्याच्या वादावर सूर्यकुमारने स्पष्टच बोलला

Suryakumar Yadav on India vs Pakistan T20 WC Match: टी२० वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेत भारताविरुद्ध सामना न खेळण्याचा पाकिस्तानने निर्णय घेतला आहे. याबाबत भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रतिक्रिया दिली आहे.
Suryakumar Yadav on IND vs PAK

Suryakumar Yadav on IND vs PAK

Sakal

Updated on

Suryakumar Yadav on India vs Pakistan T20 WC Match: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी गुरुवारी (५ फेब्रुवारी) कर्णधारांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेसाठी सहभागी संघांचे कर्णधार उपस्थित होते. यावेळी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा देखील उपस्थित होते.

यावेळी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असला मुद्दा म्हणजे पाकिस्तानने भारताविरुद्ध सामना न खेळण्याचा घेतलेल्या निर्णय, याबाबतही प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) स्पष्ट केले की ते या सामन्यासाठी कोलंबोला जाणार आहेत.

<div class="paragraphs"><p>Suryakumar Yadav on IND vs PAK</p></div>
Pakistan Cricket : हा, आमचा निर्णय नाही...! IND vs PAK लढतीवर बहिष्कार टाकणाऱ्या पाकच्या निर्णयावर कर्णधाराची मोठी प्रतिक्रिया
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com