WCL 2026, IND vs PAK: पाकडे पुन्हा तोंडावर आपटले! भारताकडून हवी होती लेखी माफी पण... क्रिकेटच्या मैदानात राडा

Pakistan Pulls Out of WCL Season 3 After PCB Denies Player NOCs: वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजंड्स २०२६ स्पर्धेतून पाकिस्तानने माघार घेतली आहे. पीसीबीने भारतीय खेळाडूंच्या माफीची अट घातल्यानंतर आयोजकांनी ती अमान्य केली आहे.
Pakistan Withdraws From World Championship of Legends Season 3

Pakistan Withdraws From World Championship of Legends Season 3

Sakal

Updated on: 

Pakistan Withdraws From World Championship of Legends Season 3: भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील संबंध गेल्या दीड वर्षांपासून अत्यंत बिघडलेले आहेत, ज्या परिणाम जवळपास सर्वच क्षेत्रावर पडला असून त्यात क्रिकेटचाही समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर आता ३ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजंड्स (WCL) च्या तिसऱ्या हंगामातील पाकिस्तानने माघार घेतली आहे.

यापूर्वी त्यांचा बांगलादेशविरुद्धचा सामना तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आला होता, पण सर्वांनाच माहित आहे की पाकिस्तान चॅम्पियन्स संघ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (PCB) ना हरकत प्रमाणपत्र (NoC) मिळण्याची वाट पाहात होते. पण आता असे समोर येत आहे की पीसीबीने ना हरकत प्रमाणपत्र दिले, परंतु काही अटी घातल्या, ज्या आयोजकांनी अखेरीस नाकारल्या.

<div class="paragraphs"><p>Pakistan Withdraws From World Championship of Legends Season 3</p></div>
ICC ODI World Cup 2027 India Fixture: India vs Pakistan एकदा नव्हे, तर तीनवेळा भिडणार, जाणून घ्या कधी व कुठे खेळणार...
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com