ICC e-mail to PCB over multiple tournament rule violations
esakal
ICC likely action against PCB for Players and Officials Area breach : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 'हस्तांदोलन' प्रकराणावरून केलेलं नाटक त्यांच्याच अंगलट येणार आहे. भारतीय खेळाडूंनी सामन्यानंतर हस्तांदोलन न केल्याने पीसीबी नाराज झाली आणि त्यांनी थेट बहिष्काराची भाषा केली. त्यांनी सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्या निलंबनाची मागणीवर जोर धरला होता. पण, आयसीसीने त्यांना दाद दिली नाही आणि वाघासारखी डरकाळी फोडणारे PCB मांजरीसारखे नरमले. यूएईविरुद्धचा सामना खेळून ते सुपर ४ मध्ये पोहोचले. पण, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( ICC) अॅक्शन मोडमध्ये आली आहे.