
पाकिस्तानचे अनेक खेळाडू बऱ्याचदा बेताल वक्तव्य करताना दिसतात. आता अशाच प्रकारे केलेल्या एका विधानामुळे माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याच्यावर थेट मानहानीचा दावा ठोकण्यात आलाय.
पाकिस्तानमधील प्रसिद्ध क्रिकेट इतिहासकार, लेखक डॉ.नौमान नियाज यांनी त्यांचा अपमान केल्याचा आरोप करत शोएब अख्तर याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.