
भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानविरुद्ध रविवारी (२३ फेब्रुवारी) चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या सामन्यात ६ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताचे सेमीफायनलमधील स्थान जवळपास पक्के झाले आहे.
मात्र यजमान पाकिस्तानचे या स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. कारण त्यांनी पहिल्या दोन्ही सामन्यात पराभव स्वीकारला असून आता त्यांचा साखळी फेरीतील फक्त बांगलादेशविरुद्धचा सामना बाकी राहिला आहे.