पाकिस्तानने सर्व सीमा ओलांडल्या; India vs Pakistan सामन्यावर बहिष्कार अन् आता ICC ला धमकी; म्हणतात, कारवाई करून दाखवाच...

Pakistan threatens ICC over India match boycott: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप सामन्यावर बहिष्कार टाकून पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व मर्यादा ओलांडल्याचं चित्र आहे. सोशल मीडियावरून पाकिस्तान सरकारने भारताविरुद्ध सामना न खेळण्याची भूमिका जाहीर केली असली, तरी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) ही भूमिका अद्याप अधिकृतरित्या ICC कडे कळवलेली नाही.
PAKISTAN THREATENS ICC OVER INDIA MATCH BOYCOTT IN T20 WORLD CUP

PAKISTAN THREATENS ICC OVER INDIA MATCH BOYCOTT IN T20 WORLD CUP

esakal

Updated on

PCB stance on India Pakistan T20 World Cup match: पाकिस्तान सरकारने आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत त्यांचा संघ भारताविरुद्धच्या ( IND vs PAK ) लढतीत खेळणार नसल्याचे सोशल मीडियावरून जाहीर केले. पण, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB ) अद्याप हा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) कळवलेला नाही. भारताविरुद्ध न खेळण्याच्या सरकारच्या निर्णयाचे पालन करण्याची ठाम भूमिका पीसीबीने घेतली आहे. ते यासाठी आयसीसीशी कोणताही संपर्क करू इच्छित नाहीत. त्यामुळे आयसीसीलाही काय कारवाई करावी हे कळेनासे झाले आहे, असे वृत्त Telecom Asia Sports ने दिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com