

Pakistan Out of T20 World Cup 2026
Sakal
Pakistan Out of T20 World Cup 2026: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत शनिवारी पाल्लेकेले येथे सुपर-८ मधील पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना झाला. हा दोन्ही संघांचा शेवटचा सामना ठरला. या सामन्यापूर्वीच यजमान असलेल्या श्रीलंकेचे स्पर्धेतील आव्हान संपले आहे. पण पाकिस्तानचेही या सामन्यादरम्यान आव्हान (Pakistan Knock Out of T20 WC) संपले.
श्रीलंका संघाने १४८ धावा करताच पाकिस्तानचा भ्रमनिरास झाला आणि त्यांना गाशा गुंडाळावा लागणार हे देखील निश्चित झाले आणि न्यूझीलंडला सेमीफायनलचे तिकीट (New Zealand in Semifinal) मिळाले. यासोबतच उपांत्य फेरीतील सामने भारतातच होतील, हे देखील निश्चित झाले.