Former Pakistan captain Basit Ali suggests PCB boycott India clash in U-19 World Cup
esakal
India vs Pakistan boycott controversy latest news: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB) सध्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा विचार करत आहे. बांगलादेशची हकालपट्टी केल्यानंतर पाकिस्तानी खवळले आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला ( ICC) धमकी देण्याचे सत्र सुरू केले आहे. पाकिस्तानने बांगलादेशच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तीन पर्यायांची चाचपणी सुरू केली आहे. त्यानुसार ते संपूर्ण स्पर्धेत दंडावर काळी फित बांधून आयसीसीच्या निर्णयाचा निषेध नोंदवताना दिसतील किंवा भारताविरुद्धच्या लढतीवर बहिष्कार टाकतील किंवा प्रत्येक विजय बांगलादेशला समर्पित करतील.. पण, यात त्यांना आणखी एक अजब सल्ला मिळाला आहे.