PAK vs WI 1st Test: पाकिस्तान अन् वेस्ट इंडिज हे सारखेच, कसोटीत दुसऱ्या दिवशी दोन्ही संघ All Out! पडल्या १९ विकेट्स

Pakistan vs West Indies 1st Test: पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना नाट्यमय वळणावर आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी तब्बल १९ विकेट्स गेल्या.
Pakistan vs West Indies 1st Test
Pakistan vs West Indies 1st TestSakal
Updated on

PAK vs WI: पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज संघात शुक्रवारपासून (१७ जानेवारीपासून) कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे. मुलतानला सुरु असलेल्या पहिल्या सामन्याला पहिल्याच डावात नाट्यपूर्ण वळण मिळालं आहे. या सामन्यात गोलंदाजांचं वर्चस्व राहिल्याचं दिसून येत आहे. दुसऱ्या दिवशी तब्बल १९ विकेट्स गेल्या.

या सामन्यात पहिल्या दिवशी पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या दिवशी सुरुवातीलाच खराब हवामानाचा फटका बसल्याने बराच वेळ वाया गेला. पण पहिल्या दिवस अखेरपर्यंत पाकिस्तानने ४ बाद १४३ धावा केल्या होत्या. त्यावर पाकिस्तानने दुसऱ्या दिवशी केवळ ८७ धावा जोडल्या आणि तब्बल ६ विकेट्स गमावल्या.

Pakistan vs West Indies 1st Test
PAK vs WI: पाकिस्तानने घरच्या मैदानावर विंडीजसमोर गुडघे टेकले, ६ फलंदाज ४३ धावांत माघारी; पहिला डाव गुंडाळला
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com