

Mohsin Naqvi Claims boycott Move Was for 'Bangladesh's Respect'
Sakal
Mohsin Naqvi Claims boycott Move Was for 'Bangladesh's Respect': टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच वादाला सुरुवात झाली होती. बांगलादेशने या स्पर्धेसाठी भारतात येण्यास नकार दिला होता. त्यांनी यासाठी सुरक्षेचं कारण दिलं होतं. त्यानंतर आयसीसीसोबतच्या (ICC)अनेक चर्चांनंतरही ते त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे बांगलादेशला टी२० वर्ल्ड कपमधून काढून स्कॉटलंडला त्यांच्या जागेवर संधी देण्यात आली.
आयसीसीच्या या कारवाईनंतर पाकिस्तानने यात उडी घेत आधी स्पर्धा खेळणार नसल्याची धमकी दिली आणि नंतर भारताविरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार (Boycott) घालणार असल्याचे जाहीर केले. पण आता हा निर्णयही मागे घेत स्पर्धा नियोजनानुसार खेळणार असल्याचे सांगितले. याबाबत बोलताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) मोहसिन नक्वी (Mohsin Naqvi) यांनी म्हटलंय की त्यांचा हेतू पूर्ण झाला आहे.