Pakistan’s Asia Cup 2025 final hopes are hanging by a thread
esakal
सुपर ४ गटात भारत आणि बांगलादेशने फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आघाडी मिळवली आहे.
पाकिस्तान आणि श्रीलंका आज आपला पहिला विजय मिळवण्यासाठी मैदानावर उतरले आहेत.
पाकिस्तानचा नेट रन रेट (-0.689) श्रीलंकेच्या (-0.121) तुलनेत खालावलेला आहे.
Asia Cup 2025 qualification scenario explained for Pakistan : आशिया चषक २०२५ स्पर्धेच्या सुपर ४ गटात भारत व बांगलादेश या दोन्ही संघानी विजय मिळवून अंतिम फेरीच्या शर्यतीत आघाडी घेतली आहे. भारताला उर्वरित सामन्यांत बांगलादेश व श्रीलंका यांचा सामना करायचा आहे, तर बांगलादेश पाकिस्तान व भारताला भिडणार आहे. अशात पाकिस्तान व श्रीलंका यांच्यात आज सामना होणार आहे. हे दोन्ही संघ सुपर ४ मध्ये आपापले सामने गमावून आज पहिल्या विजयासाठी मैदानावर उतरणार आहेत. पाकिस्तानचा संघ भारताविरुद्धच्या दोन पराभवांची परतफेड फायनलमध्ये करण्याची वाट पाहत आहेत, पंरतु त्यांचे आव्हान सुपर ४ मध्येच संपुष्टात येईल, अशी परिस्थिती आहे.