पाकिस्तानचं नाक कापलं गेलं! India vs Pakistan लढत खेळण्यास तयार; म्हणतात, क्रिकेटचं हित जपण्यासाठी हा निर्णय घेतोय...

Shehbaz Sharif U-turn on India Pakistan cricket clash: पाकिस्तान सरकारनं अखेर माघार घेत भारताविरुद्ध वर्ल्ड कप सामना खेळण्यास परवानगी दिली आहे. भारत-पाकिस्तान सामन्यावरून निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय वादानंतर हा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर बांगलादेश, श्रीलंका, इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) यांच्यासह अनेक क्रिकेट राष्ट्रांचा दबाव होता.
PAKISTAN's GOVERNMENT STATEMENT

PAKISTAN's GOVERNMENT STATEMENT

Updated on

Why Pakistan agreed to play India in T20 World Cup? पाकिस्तान सरकारने अखेर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्धच्या लढतीत पाकिस्तानला खेळण्याची परवानगी दिली. त्यामुळे ठरलेल्या वेळापत्रकानुसार १५ फेब्रुवारीला कोलंबो येथे IND vs PAK सामना होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) चर्चा केल्यानंतर पाकिस्तान सरकारने त्यांचा निर्णय जाहीर केला. मागील आठवड्यात पंतप्रधान शेहबाज शरिफ ( Shehbaz Sharif ) यांनी सोशल मीडियावर India vs Pakistan लढतीवर बहिष्कार टाकल्याची घोषणा केली होती आणि ८ दिवसांनी त्यांनाच त्यांचा निर्णय बदलावा लागला. जगात नाक कापलं गेल्यानंतर पाकिस्तान सरकारकडून आता सारवासारव होताना दिसतेय...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com