पॅट कमिन्स कर्णधार असणार की नाही? Ball Tampering Controversy नंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला निर्णय

Cricket Australia Board Backs Pat Cummins as Captain: २०१८ साली झालेल्या चेंडू छेडछाड प्रकरणाबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियात पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत. यानंतर पॅट कमिन्सच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. याबाबत आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Cricket Australia board backs Pat Cummins as captain

Cricket Australia board backs Pat Cummins as captain

Sakal

Updated on: 

Cricket Australia board backs Pat Cummins as captain: क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये सध्या २०१८ साली झालेल्या चेंडू छेडछाड प्रकरणाबाबत चर्चा होत आहेत. अशात पॅट कमिन्सच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. या पार्श्वभूमीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाची नुकतीच बैठक पार पडली, ज्यात कमिन्सच्या नेतृत्वाबाबत निर्णय घेतला गेला आहे.

काही दिवसांपूर्वी उस्मान ख्वाजाने त्याच्या सब्र पुस्तकात चेंडू छेडछाड प्रकरणाबाबत उल्लेख करत मोठा गौप्यस्फोट केला. त्याने सांगितले की मार्च २०१८ मध्ये केपटाऊन येथे झालेल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सँडपेपरचा वापर करून चेंडू छेडछाड केली जात असल्याची माहिती संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाला होती. याला डेव्हिड वॉर्नरनेही दुजोरा दिला आहे.

Cricket Australia board backs Pat Cummins as captain
IND vs NZ, 1st Test: शुभमन गिलचं शतक फक्त २ धावांनी हुकलं, पण धोनीचा मोठा विक्रम मोडला! दिग्गजांच्या यादीत सामील
Loading content, please wait...