PBKS vs MI Live : सूर्या का खेळत नाही, हे जसप्रीत बुमराहने सांगितले; हार्दिकचे साधे नावही नाही घेतले! म्हणाला, या टीमचे कर्णधारपद...

IPL 2026 PBKS vs MI Marathi Cricket News : पंजाब किंग्सविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्स दोन प्रमुख खेळाडूंशिवाय मैदानात उतरली. कर्णधार हार्दिक पांड्या आणि स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव या दोघांची अनुपस्थिती चाहत्यांसाठी मोठा धक्का ठरली. सामन्यापूर्वी नव्या कर्णधार जसप्रीत बुमराहने या दोघांच्या अनुपस्थितीमागील कारण स्पष्ट केले.
Jasprit Bumrah explains MI team changes

Jasprit Bumrah explains MI team changes

esakal

Updated on

Punjab Kings vs Mumbai Indians Marathi Updates : मुंबई इंडियन्स इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये पंजाब किंग्सविरुद्ध नव्या कर्णधारासह मैदानावर उतरला. नियमित कर्णधार हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव, हे दोघंही पंजाबविरुद्धच्या सामन्याला मुकले आहेत. त्यामुळे जसप्रीत बुमराह MI चे नेतृत्व करायला मैदानावर आला. जसप्रीतने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. १९ वर्षांचा असताना या फ्रँचायझीमध्ये आलो आणि आज कर्णधाराचा मान मिळाला, अशा भावना जसप्रीतने व्यक्त केल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com