

Punjab Kings vs Rajasthan Royals Marathi Updates: पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स, यांच्यातला सामना म्हटलं की चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळण्याची अपेक्षा. पण, इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या मंगळवारच्या लढतीत तो उत्साह फार दिसला नाही. पंजाबने २०० पार धावा उभ्या केल्या असल्या तरी, अपेक्षित आक्रमकतेचा अभाव जाणवला. राजस्थानच्या गोलंदाजांनी चांगला मारा केला. मार्कस स्टॉयनिसने शेवटच्या षटकांत दमदार फटकेबाजी करून वादळी अर्धशतकासह संघाला दोनशेपार पोहोचवले.