PCB has lodged an official complaint with the ICC citing Match Referee’s violation of the Spirit of Cricket
esakal
भारताने पाकिस्तानवर ७ विकेट्स राखून विजय मिळवून सुपर ४ मध्ये धडक दिली.
सूर्यकुमार यादवने नाणेफेकवेळी पाक कर्णधार सलमान आगासोबत हस्तांदोलन टाळले.
सामन्यानंतरही भारतीय खेळाडू हस्तांदोलन न करता थेट ड्रेसिंग रुममध्ये गेले.
PCB demands removal of Asia Cup 2025 Match Referee : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB) पुरता वेडा झाला आहे. भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेच्या लढतीत पाकिस्तानी खेळाडूंचा केलेला अपमान, PCB च्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच त्यांनी थेट जय शाह अध्यक्ष असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे तक्रार केली आहे. त्यात त्यांनी खूप महत्त्वाची मागणी केली आहे आणि आता पुढे काय होतंय, याची उत्सुकता लागली आहे.