

PSL
Sakal
PSL 11 Media Rights Withheld for India: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड रोज काही ना काही नाटक करताना दिसत आहेत. आयासीसीने बांगलादेशला टी२० वर्ल्ड कप २०२६ मधून काढल्यानंतर पाकिस्तानने या वादात उडी घेतली. आधी त्यांनी टी२० वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याच्या बाता केल्या होत्या.
त्यानंतर हा विचार बदलून आता स्पर्धेत सहभागी होऊ, पण १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध होणारा सामना खेळणार नसल्याचं म्हणत आहेत. तसं पाकिस्तान सरकारकडून जाहीर करण्यात आलंय. यावरून आयसीसीने (ICC) नाराजीही व्यक्त केली असून कारवाईचे संकेत दिले आहेत.