Australia A Squad: 'बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी'आधी ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय;३५ वर्षीय खेळाडूला दिले भारत दौऱ्याचे तिकीट!

Australia A Squad for India Tour: ऑस्ट्रेलिया कसोटी संघ पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यापूर्वी ऑस्ट्रेलिया अ संघ भारत दौऱ्यावर येत असून या संघात ३५ वर्षीय खेळाडूला पुनरागमनाची संधी देण्यात आली आहे.
Australia A Squad for India Tour

Peter Handscomb

Sakal

Updated on

Australia A Squad for India Tour, Marathi News: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर येऊन कसोटी मालिका खेळायची आहे. त्यामुळे त्याआधी सप्टेंबर २०२६ च्या अखेरीस ऑस्ट्रेलिया अ संघ भारत दौऱ्यावर येणार आहे.

ऑस्ट्रेलिया अ संघाचा दौरा पुढच्या वर्षी होणाऱ्या कसोटी मालिकेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ऑस्ट्रेलिया अ संघातील खेळाडूंच्या कामगिरीकडे त्यांच्या बोर्डाचे लक्ष राहणार असून या दौऱ्यात कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुढच्या वर्षी कसोटी संघात खेळण्याची संधी मिळू शकते.

Australia A Squad for India Tour
U19 IND vs U19 AUS: सेहवाग - द्रविडची मुलं आता भारतीय संघात! ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यांसाठी युवा संघाची घोषणा
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com