Phil Salt and Jos Buttler’s record-breaking partnership powers England past India’s T20I record.
esakal
इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मँचेस्टरमध्ये आक्रमक फलंदाजी करत विक्रमी धावा केल्या.
फिल सॉल्ट व जॉस बटलर या जोडीने पॉवर प्लेमध्ये १०० धावा चोपून पाया भक्कम केला.
फिल सॉल्टने ३९ चेंडूत शतक झळकावत इंग्लंडकडून सर्वात जलद टी२० शतकवीर ठरला.
England vs South Africa 2nd T20I Live : इंग्लंडने मँचेस्टरचे मैदान दणाणून सोडले... कागिसो रबाडा, मार्को यान्सेन यासारख्या अनुभवी गोलंदाजांची त्यांनी यथेच्छ धुलाई केली. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची त्यांनी पिळवणूक लावली होती. एखादा गल्ली क्रिकेट सामना सुरू असल्याचे जाणवत होते. फिल सॉल्ट ( PHIL SALT ) व जॉस बटलर ( JOS BUTTLER ) या सलामीच्या जोडीने आफ्रिकन गोलंदाजांचा पालापाचोळा केला. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये १०० धावा चोपून मनसूबे स्पष्ट केले होते. पहिल्या १० षटकांत इंग्लंडने १ बाद १६६ धावा करून मोठा विक्रम नावावर केला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील पहिल्या दहा षटकांतील ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली..