

Pragyan Ojha Set to Take Charge as BCCI’s New Chief Selector
Sakal
Interim Chief Selector of Indian Cricket Team: भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीत बदल होण्याची चिन्ह दिसत आहेत. निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) यांचा कार्यकाळ ४ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. त्यांचा कार्यकाळ यापुढे वाढवला जाण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जात आहे. पण आता त्यांच्या जागेवर कोणाला संधी मिळणार, हा प्रश्न आहे. सध्या एक नाव चर्चेत आहे.
सध्या भारत आणि वेस्ट इंडिज संघ गुवाहाटीमध्ये असून बुधवारी दुसरा वनडे सामना होणार आहे. त्याआधी मंगळवारी गुवाहाटीमध्ये निवड समितची बैठक झाली होती. मात्र या बैठकीसाठी अजित आगरकर उपस्थित नव्हते. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.