
भारत आणि पाकिस्तान हे दोन शत्रू देश समजले जातात. त्यातच गेल्या अनेक वर्षांपासून या दोन देशातील संबंध बिघडले आहेत. नुकताच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तर परिस्थिती आणखी चिघळली आहे. अशात भारत-पाकिस्तान यांच्यात कोणत्याच प्रकारचे क्रिकेट खेळले जाऊ नये अशा मागण्याही होत आहेत.
जवळपास दशकापासून या दोन देशात द्वीपक्षीय मालिका होत नाहीत, फक्त आयसीसी आणि आशियाई स्पर्धेतच हे दोन संघ आमने - सामने असतात. याशिवाय इंडियन प्रीमियर लगीमध्येही (IPL) पाकिस्तानच्या खेळाडूंना खेळण्यापासून बीसीसीआयने बंदी घातली आहे.