
भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग आणि पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा सुरू आहे. आयपीएलचा १८ वा हंगाम सुरू आहे, तर पीएसएलचा १० वा हंगाम सुरू आहे. त्यामुळे सध्या या दोन संघात तुलना होत आहे.
याचदरम्यान, आता पीएसएलमध्ये खेळत असलेल्या सॅम बिलिंग्सला याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यानेही स्पष्ट उत्तर दिले आहे की आयपीएलला सर्वात उत्तम स्पर्धा आहे. बिलिंग्स आयपीएल २०२५ लिलावात अनसोल्ड राहिला होता. तो पीएसएलमध्ये लाहोर कलंदर्सकडून खेळत आहे.