

Prema Rawat Breaks Fatima Sana Record
esakal
Prema Rawat Breaks Fatima Sana Record: पाकिस्तानी संघाच्या खेळाडूचा विक्रम भारतीय खेळाडूने मोडीत काढला आहे. भारतीय महिला क्रिकेटपटू प्रेमा रावतने पाकिस्तानच्या फातिमा सनाचा विक्रम मोडून आपल्या नावावर केला आहे.
उत्तराखंडकडून खेळताना प्रेमाने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात ६ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने केवळ १४ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. तिच्या या खेळीमुळे उत्तराखंड संघाला २० षटकांत १८० धावा करता आल्या.