

Prithvi Shaw Captain for Maharashtra's Ranji Trophy Season Opener
Sakal
Maharashtra Squad for Ranji Trophy 2026-27 Opener: भारतातील अत्यंत प्रतिष्ठित देशांतर्गत स्पर्धा रणजी ट्रॉफी २०२६-२७ स्पर्धा ११ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी राज्य संघटनांनी त्यांचे संघ घोषित करण्यासही सुरुवात केली असून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननेही पहिल्या सामन्यासाठी १६ जणांचा संघ जाहीर केला आहे. विशेष म्हणजे पहिल्या सामन्यासाठी सलामीवीर पृथ्वी शॉ याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.