मागील दोन सामन्यांत चांगली कामगिरी करूनही पृथ्वी शॉला महाराष्ट्राच्या प्लेइंग इलेव्हनमधून विश्रांती देण्यात आली.
त्याच्या जागी सलामीला आलेल्या अर्शीन कुलकर्णीने १९० चेंडूंमध्ये १४६ धावांची खेळी केली.
ऋतुराज गायकवाड आणि अर्शीनने दुसऱ्या विकेटसाठी २२० धावांची भागीदारी केली.
Why was Prithvi Shaw dropped from Buchi Babu Trophy squad? महाराष्ट्राच्या संघाकडून मागील दोन सामन्यांत शतक व अर्धशतक झळकावणाऱ्या पृथ्वी शॉ याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. त्याच्या जागी सलामीला संधी मिळालेल्या अर्शीन कुलकर्णीने ( Arshin Kulkarni ) १४६ धावांची खेळी केली. बुची बाबू ट्रॉफी २०२५ स्पर्धेत महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल प्रदेश यांच्यातल्या लढतीत ऋतुराज गायकवाड व अर्शीन यांच्या शतकाने महाराष्ट्राने मोठी धावसंख्या उभारली आहे.