पृथ्वी शॉने महाराष्ट्राकडून बुची बाबू ट्रॉफीत शतक झळकावून पुनरागमनाचे संकेत दिले.
चेन्नईत झालेल्या या शतकानंतर CSK ने पोस्ट केलेल्या व्हिडिओमुळे चर्चांना उधाण आले.
CSK च्या पोस्टखाली चाहत्यांनी "CSK Calling" म्हणत पृथ्वीच्या ताफ्यातील प्रवेशावर चर्चा सुरू केली.
Will Prithvi Shaw join Chennai Super Kings in IPL 2026? : क्रिकेट कारकीर्दिला नवीन उभारी देण्यासाठी पृथ्वी शॉ याने मुंबईची साथ सोडून महाराष्ट्र संघाकडून घेतलेला निर्णय योग्य ठरताना दिसतोय. बुची बाबू ट्रॉफीतील महाराष्ट्राकडून पहिल्याच सामन्यात पृथ्वीने छत्तीसगडविरुद्ध शतक झळकावले. चेन्नईत झालेल्या या सामन्यात पृथ्वीच्या शतकाने महाराष्ट्राला आघाडी मिळवून दिली होती, परंतु छत्तीसगडने पुनरागमन करून सामना जिंकला. पण, या सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने पोस्ट केलेल्या Video ची चर्चा सुरू झाली आहे.