इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या सुधारित वेळापत्रकाची घोषण काल BCCI ने केली. India Pakistan War मुळे आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला होता. पण, १७ मे २०२५ पासून आयपीएलला पुन्हा सुरुवात होतेय आणि हे पाहून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या ( PCB) पोटात दुखू लागले आहे.BCCI स्पर्धा घेतेय, मग आम्ही पण घेणार अशी कंबर त्यांनी कसली आहे आणि त्याच तारखेपासून PSL ला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.