

Shreyas Iyer | IPL 2026
Sakal
PBKS vs GT Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) चौथा सामना मुल्लनपूरमध्ये पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्सने शेवटच्या षटकात ३ विकेट्सने विजय मिळवला. मात्र असे असले तरी या सामन्यानंतर पंजाब किंग्सचा (Punjab Kings) कर्णधार श्रेयस अय्यरवर (Shreyas Iyer) बीसीसीआयकडून (BCCI) कारवाई झाली आहे.
बीसीसीआयकडून श्रेयस अय्यरला १२ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. यामागचे कारण म्हणजे पंजाब किंग्सला निर्धारित वेळेत २० षटके पूर्ण करता आली नाहीत. याबाबत बीसीसीआयने माहिती दिली आहे.