IPL 2024: पंजाब किंग्सने रचला इतिहास, आजपर्यंत जगातील कोणत्याच संघाला न जमलेला केला पराक्रम

Punjab Kings Record: पंजाब किंग्सने टी20 क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणालाच न जमलेला विक्रम करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
Punjab Kings | IPL 2024
Punjab Kings | IPL 2024Sakal

Punjab Kings IPL News: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 17व्या सामन्यात पंजाब किंग्सने गुजरात टायटन्सविरुद्ध 1 चेंडू राखून 3 विकेट्सने रोमांचक विजय मिळवला. याबरोबरच एका मोठ्या विक्रमालाही गवसणी घातली आहे.

या सामन्यात गुजरातने पंजाब किंग्सला 200 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग पंजाब किंग्सने 19.5 षटकात 7 विकेट्स गमावत पूर्ण केला. त्यामुळे पंजाब किंग्सने टी20 क्रिकेटमध्ये सहाव्यांदा 200 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करण्याचा विश्वविक्रम केला आहे.

Punjab Kings | IPL 2024
IPL 2024: राज्याचा संघ सोडला, युवराजचा रेकॉर्ड मोडला अन् आता पंजाबचा तारणहारही ठरला; कोण आहे अशुतोष शर्मा?

यापूर्वी कोणत्याच संघाने टी20 क्रिकेटमध्ये 6 वेळा 200 किंवा त्यापेक्षा अधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करता आला नव्हता. याआधी भारत, ऑस्ट्रेलिया, मुंबई इंडियन्स आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स या संघांनी टी20 क्रिकेटमध्ये 5 वेळा 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे.

आयपीएलमध्ये पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांनी 3 वेळा 200 किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.

Punjab Kings | IPL 2024
Mumbai Indians: 'रोहितच्या नेतृत्वातही मुंबईने सलग 5 सामने हरलेत...', सेहवागचाही हार्दिकला पाठिंबा?

या सामन्यात 200 धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्सकडून शशांक सिंगने 29 चेंडूत नाबाद 61 धावांची खेळी केली. तसेच प्रभसिमरन सिंगने 24 चेंडूत 35 धावांची, तर अशुतोष शर्माने 17 चेंडूत 31 धावांची खेळी केली. गुजरातकडून नूर अहमदने 2 विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी, गुजरातने 20 षटकात 4 बाद 199 धावा केल्या होत्या. गुजरातकडून कर्णधार शुभमन गिलने 48 चेंडूत 89 धावांची नाबाद खेळी केली. तसेच साई सुदर्शनने 19 चेंडूत 33 धावा केल्या. पंजाबकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com