
Syed Modi Tournament: सध्या फॉर्म हरपलेला असलेल्या पी. व्ही. सिंधूने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असला तरी कालच्या (२८ नोव्हेंबर) सामन्यात तिला विजयासाठी संघर्ष करावा लागला.
दुसऱ्या फेरीच्या लढतीत सिंधूने इरा शर्मावर २१-१०, १२-२१, २१-१५ अशी मात केली. हा सामना ४९ मिनिटे चालला. त्याआधी झालेल्या पहिल्या फेरीतही सिंधूला अनमोल खराबने झुंजवले होते.