
भारताचा माजी क्रिकेटपटू आर अश्विनसाठी आयपीएल २०२५ हंगाम अत्यंत निराशाजनक राहिला होता. त्याने त्याची निराशा स्पष्ट बोलूनही दाखवली होती. पण आयपीएलमधील जखमा तामिळनाडू प्रीमियर लीगमधून (TNPL) भरून काढण्याचा प्रयत्न आता अश्विन करताना दिसतोय.
नुकतीच त्याची अष्टपैलू कामगिरी सर्वांना पाहायला मिळाला आहे. अश्विनने त्याच्या नेतृत्वात दिंडिगुल ड्र्रॅगन्सला टीएनपीएलच्या क्वालिफायर २ स्पर्धेपर्यंत पोहचवले आहे. त्याने एलिमिनेटर सामन्यात गोलंदाजीपाठोपाठ फलंदाजीतही मोठा कारनामा केला.