IPL 2026: ईशान किशनने CSK च्या चाहत्यांची खिल्ली उडवताना मर्यादा ओलांडली? आर अश्विन म्हणतोय, '...तर ईगो कशासाठी?

R Ashwin on Ishan Kishan's Whistle Podu Celebration: चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केल्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनने प्रेक्षकांना उद्देशून सेलिब्रेशन केले होते. त्याच्या या सेलिब्रेशनवर टीकाही झाली. त्यावर आता आर अश्विनने त्याचे मत मांडले आहे.
R Ashwin on Ishan Kishan's Whistle Podu Celebration

R Ashwin on Ishan Kishan's Whistle Podu Celebration

Sakal

Updated on

CSK vs SRH Marathi News: सोमवारी इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्सने पराभूत केले आणि प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. हा सामना चेन्नईचं घरचं मैदान चेपॉक स्टेडियमवर झाला होता. त्यामुळे संपूर्ण सामन्यात चेन्नई संघाला मोठा पाठिंबा मिळाला.

मात्र सामन्यानंतर हैदराबादचा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनने (Ishan Kishan) केलेले हातवारे आणि सेलिब्रेशनने (Celebration) मात्र अनेकांचे लक्ष वेधले. त्यावरून त्याला ट्रोलही करण्यात आले. त्यावर आता आर अश्विनने (R Ashwin) त्याचे मत मांडले आहे.

R Ashwin on Ishan Kishan's Whistle Podu Celebration
IPL 2026, LSG vs RR: 'पराभूत झालो, तरीही आमचा संघ...', रिषभ पंतची 'F' ची भाषा, पराभवानंतर ऑन कॅमेरा दिली शिवी; VIDEO
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com