

Ruturaj Gaikwad - Virat Kohli
Sakal
भारतीय क्रिकेट संघाला ११ जानेवारीपासून न्यूझीलंड विरुद्ध वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी ३ जानेवारी रोजी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या मालिकेसाठी कर्णधार शुभमन गिलसह उपकर्णधार श्रेयस अय्यर आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याचेही भारतीय वनडे संघात (India ODI Squad) पुनरागमन झाले आहे.
मात्र या मालिकेसाठी भारताच्या संघातून महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) वगळण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.