

Ashwin Counters Shreevats Goswami on Usman Tariq Debate
Sakal
Ashwin Counters Shreevats Goswami on Usman Tariq Debate: पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज उस्मान तारीक पुन्हा एकदा त्याच्या गोलंदाजी शैलीमुळे चर्चेत आला आला आहे. काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीन याने तारीक चेंडू फेकत असल्याची तक्रार केली होती. त्याची गोलंदाजी शैली नियमात बसल नसल्याचीही चर्चा बऱ्याचदा होत असते.
आता टी२० वर्ल्ड कप २०२६ (T20 World Cup) दरम्यानही पुन्हा एकदा त्याच्या गोलंदाजीवर वाद होताना दिसत आहे. मात्र, भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज आर अश्विनने (R Ashwin) टीक करणाऱ्यांना सुनावले असून केवळ गोलंदाजांनाच बंधनं का, असा सवालही त्याने उपस्थित केला आहे.