MS Dhoni fresh injury latest update
esakal
R Ashwin tweet on MS Dhoni viral reaction : इंडियन प्रीमीअर लीग २०२६ मध्ये सोमवारी सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनी खेळणार की नाही, हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. चेन्नई सुपर किंग्स ( CSK ) आयपीएल २०२६ च्या पर्वातील घरच्या मैदानावरील त्यांचा शेवटचा सामना खेळणार आहे. त्यामुळे MS Dhoni ला खेळताना पाहण्यासाठी चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसेल, यात शंका नाही. पण, दुखापतीमुळे धोनीला या पर्वात एकही सामना खेळता आलेला नाही. आज तो घरच्या मैदानावर किमान इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळेल आणि निवृत्त होईल, अशीही चर्चा आहे.