Rohit Sharma Stand: 'आता मुंबईत जर तिकीट मिळालं नाही, तर...' रोहित शर्मासाठी राहुल द्रविडचा खास मेसेज; MI ने शेअर केला VIDEO
Dravid message to Rohit Sharma: वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्माच्या नावाच्या स्टँडचं उद्घाटन करण्यात आलं आहे. त्यानिमित्ताने राहुल द्रविडने त्याला खास संदेश दिला आहे. मुंबई इंडियन्सने त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
भारताचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्माचा नुकताच मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मोठा गौरव करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच मुंबई क्रिकेट असोसिएशनने घेतलेल्या निर्णयानुसार वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्माच्या नावाच्या स्टँडचे उद्घाटन करण्यात आले.