India Head Coach : टीम इंडियाच्या मुख्य कोच निवडीबाबत मोठी अपडेट; राहुल द्रविडनंतर 'या' दिग्गज खेळाडूने अर्ज भरण्यास दिला नकार

Team India Head Coach News : भारताच्या दोन दिग्गजांनी प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्यास दिला नकार
Rahul Dravid VVS Laxman unlikely as Team India next Head Coach
Rahul Dravid VVS Laxman unlikely as Team India next Head Coachsakal

Team India Head Coach : बीसीसीआयने भारतीय पुरूष क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकाचा शोध युद्धपातळीवर सुरू केला आहे. बीसीसीआयने यासाठी नुकतेच अर्ज मागवण्याचा प्रक्रिया सुरू केली आहे. जूनमध्ये टी 20 वर्ल्डकप संपल्यावर भारताचा सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे जय शहा यांनी प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे. राहुल द्रविड पुन्हा अर्ज करू शकतो. मात्र माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार राहुल द्रविड यासाठी उत्सुक नाही.

Rahul Dravid VVS Laxman unlikely as Team India next Head Coach
IPL 2024 : 18 मे रोजी होणारा RCB Vs CSK सामना पावसामुळे रद्द झाला तर… प्लेऑफसाठी कोण ठरणार पात्र?

राहुल द्रविडनंतर एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणचे नाव यासाठी जोरदार चर्चेत होतं. द्रविडच्या अनुपस्थितीत तो भारतीय संघाचे प्रशिक्षक पद भूषवत होता. मात्र तोही अर्ज करण्यासाठी उत्सुक नसल्याची माहिती समोर येत आहे.

वरिष्ठ खेळाडूंच्या विनंतीनंतरही द्रविडचा नकार

मिळालेल्या माहितीनुसार संघातील काही वरिष्ठ खेळाडू हे राहुल द्रविड WTC चॅम्पियनशिपच्या फायनलपर्यंत म्हणजे एक वर्ष द्रविडने प्रशिक्षक पद सांभाळावं अशी विनंती केली होती. मात्र द्रविडने यासाठी नकार दिला आहे. द्रविडने कसोटीचे प्रशिक्षकपद सांभाळावं अशी या खेळाडूंची मागणी होती. मात्र जर द्रविड हा पर्याय निवडतो तर बीसीसीआयला दोन प्रशिक्षक नियुक्त करावे लागणार होते.

Rahul Dravid VVS Laxman unlikely as Team India next Head Coach
DC Playoffs Scenario : दिल्लीचं नशिब हैदराबादच्या हाती! प्लेऑफ गाठण्यासाठी जुळावे लागणार 'हे' गणित...

लक्ष्मणही अर्ज करणार नाही

द्रविडचा उत्तराधिकारी म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मणचे नाव आघाडीवर होते. मात्र स्टार स्पोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मण या पदासाठी अर्ज करणार नाहीये. बीसीसीआय सध्या विदेशी प्रशिक्षकाचा देखील विचार करत आहे. काही आयपीएल फ्रेंचायजींच्या मुख्य प्रशिक्षकांनी यासाठी अर्ज देखील केला आहे.

(Cricket Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com