IPL 2026 Rajat Patidar honest statement
esakal
RCB vs MI Rajat Patidar post match reaction: इंडियन प्रीमिअर लीग २०२६मध्ये २६४ धावांच्या लक्ष्याचा सहज पाठलाग होत असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची १६७ धावांचा पाठलाग करतान दमछाक झाली. भुवनेश्वर कुमारने २०व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार खेचला नसता तर मुंबई इंडियन्सचा विजय पक्का होता. त्यानंतर रसिख सलामने शेवटच्या चेंडूवर दोन धाव घेत RCB चा रोमहर्षक विजय पक्का केला. या विजयासोबत गतविजेत्यांनी IPL 2026 Point Table मध्ये अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. पण, असे असले तरी कर्णधार रजत पाटीदार या विजयावर फार आनंदी दिसला नाही.