Duleep Trophy Final: रजत पाटीदारचे खणखणीत शतक! भारताच्या कसोटी संघासाठी ठोकला दावा; श्रेयसच्या मार्गात ठरणार अडथळा

Rajat Patidar century in Duleep Trophy Final 2025 : रजत पाटीदारने सातत्य दाखवताना दुलीप ट्रॉफीमध्ये सलग चौथ्या डावात ५०+ धावांची खेळी केली. भारतीय संघ पुढील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे आणि त्यात संधी मिळण्याच्या दृष्टीने रजतची ही खेळी महत्त्वाची ठरतेय.
Rajat Patidar century in Duleep Trophy Final 2025 against South Zone

Rajat Patidar century in Duleep Trophy Final 2025 against South Zone

esakal

Updated on
Summary
  • दुलीप ट्रॉफी फायनलमध्ये दक्षिण विभाग १४९ धावांवर गडगडला, मध्य विभागाने पकड मजबूत केली.

  • कर्णधार रजत पाटीदारने ११५ चेंडूत १२ चौकार व २ षटकारासह शतक झळकावले.

  • पाटीदारने मागील तीन डावांत ७७, १२५ व ६६ धावा करून सातत्य दाखवले आहे.

Rajat Patidar century in Duleep Trophy Final 2025 against South Zone : दुलीप ट्रॉफी फायनलमध्ये दक्षिण विभागाचा डाव १४९ धावांवर गुंडाळल्यानंतर मध्य विभागाने सामन्यावरील पकड मजबूत केली आहे. कर्णधार रजत पाटीदारने ११२ चेंडूंत १२ चौकार व २ षटकारासह शतक झळकावले. मध्य विभागाचा कर्णधार असलेल्या रजतने दुलीप ट्रॉफीत सातत्याने धावा केल्या आहेत. त्याने मागील तीन डावांत ७७, १२५ व ६६ अशी खेळी केली आहे. भारतीय संघ पुढील महिन्यात घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. त्यासाठीचा संघ लवकरच जाहीर केला जाईल आणि निवड समितीच्या सदस्यांनी दुलीप ट्रॉफीवरही लक्ष ठेवले आहे. त्यामुळे रजतची ही खेळी महत्त्वाची ठऱतेय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com