RAJAT PATIDAR TAKES SENSATIONAL CATCH
esakal
दुलीप ट्रॉफी फायनलमध्ये मध्य विभागाने दक्षिण विभागाला केवळ १४९ धावांत गुंडाळले
कुमार कार्तिकेयने २१ षटकांत ५३ धावा देत ४ महत्वाच्या विकेट्स घेतल्या.
सारांश जैनने २४ षटकांत ५ बळी घेत दक्षिण विभागाचा कणा मोडला.
Central Zone bowling performance Duleep Trophy Final : आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने विजयी सुरुवात केली असताना देशांतर्गत क्रिकेटमध्येही भारतीय खेळाडू चमकत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदार ( Rajat Patidar) याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मध्य विभाग संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कुमार कार्तिकेय ( Kumar Kartikeya) व सारांश जैन यांच्या टिच्चून माऱ्यासमोर दक्षिण विभागाचा पहिला डाव ६३ षटकांत १४९ धावांवर गडगडला. या सामन्यात रजतने घेतलेल्या अविश्वसनीय झेलने सर्वांचे लक्ष वेधले.