Cheteshwar Pujara
Cheteshwar Pujaraesakal

Cheteshwar Pujara : पुजाराने पुन्हा ठोठावलं टीम इंडियाचं दार, संघ हरला मात्र चेतेश्वर लढला

Ranji Trophy 2024 Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजाराचा संघ सौराष्ट्र हा तामिळनाडूकडून उपांत्य पूर्ण फेरीत हरला आहे. मात्र पुजाराने आपल्या कामगिरीने निवडसमितीचे लक्ष वेधून घेतलं आहे.

Ranji Trophy 2024 Cheteshwar Pujara Team India Selection : रणजी ट्रॉफी 2024 मधील सौराष्ट्रचं आव्हान उपांत्य पूर्व फेरीतच संपुष्टात आलं. तामिळनाडूने सैराष्ट्रचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. मात्र रणजी ट्रॉफीच्या यंदाच्या हंगामातील सौराष्ट्रचे आव्हान जरी संपुष्टात आलं असलं तरी चेतेश्वर पुजाराने ज्या प्रकारे दुसऱ्या डावात फलंदाजी केली ते पाहून त्यानं पुन्हा एकदा निवडसमितीला आपल्या नावाचा विचार करण्यात भाग पाडलं आहे.

Cheteshwar Pujara
Umpires Call Controversy : अंपायर कॉल पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! तरीही का नाहीत बदलले जात नियम? जाणून घ्या कारण

तामिळनाडूविरूद्धच्या सामन्यात सौराष्ट्रचा दुसरा डाव हा 122 धावात संपुष्टात आला होता. मात्र पुजाराने तामिळनाडूच्या गोलंदाजांचा चांगलाच घाम काढळा. त्याने 170 चेंडू खेळून काढत 46 धावांची झुंजार खेळी केली. पुजाराशिवाय सौराष्ट्रकडून फक्त केव्हिन जिव्हराजानीलाच 27 धावा करता आल्या.

सौराष्ट्रने उपांत्यपूर्व फेरीचा सामना हरला असला तरी पुजारासाठी हा रणजी हंगाम उत्तम गेला आहे. त्याने आठ सामन्यात 829 धावा केल्या आहेत. त्याने 69.08 च्या सरासरीने या धावा केल्या असून यात 243 धावांच्या सर्वोच्च खेळाचा देखील समावेश आहे.

Cheteshwar Pujara
Rohit Sharma Stump Mic Video : ए हिरोपंती नको... रोहितनं सर्फराजचे कान का उपटले?

भारतीय संघ सध्या इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिका खेळत आहे. भारतीय संघातील अनेक खेळाडू हे दुखापतग्रस्त झाले आहेत. अनेक खेळाडूंनी वैयक्तिक कारणाने किंवा विश्रांतीसाठी मालिकेतून माघार घेतली आहे.

जर अजून एखाद्या खेळाडूला दुखापत झाली किंवा त्याने माघार घेतली तर मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात पुजाराची वर्णी देखील लागू शकते. मालिकेतील पाचवा सामना हा 7 मार्च रोजी धरमशाला येथे होत आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com