रवी शास्त्रींनी निवडला भारत-इंग्लंडचा All Time XI संघ; धोनी कर्णधार, तर गांगुलीला मात्र...

Ravi Shastri Names All-Time India-England ODI XI: रवी शास्त्री यांनी भारत आणि इंग्लंड यांची मिळून सार्वकालिन सर्वोत्तम संघ निवडला आहे. या संघाचा कर्णधार धोनीला केले असून ९ भारतीयांना संधी दिली आहे.
Ravi Shastri Names All-Time India-England ODI XI

Ravi Shastri Names All-Time India-England ODI XI

Sakal

Updated on

भारताचा इंग्लंड दौरा नुकताच संपला. या दौऱ्यात भारताची फारशी कामगिरी चांगली झाली नाही, टी२० संघाकडून पूर्णच निराशा झाली. टी२० मालिका ४-० ने पराभूत झाल्यानंतर वनडे मालिकेत काही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, पण तरीही मालिका २-१ ने गमावली.

यादरम्यानच भारताचा माजी अष्टपैलू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी भारत आणि इंग्लंड (India-England) यांची मिळून सार्वकालिन सर्वोत्तम प्लेइंग ११ संघ (All Time XI) निवडला आहे.

रवी शास्त्रींनी स्काय स्पोर्ट्सच्या युट्युब चॅनेलवर हा संघ निवडला आहे. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांनी भारताचा दिग्गज कर्णधार सौरव गांगुलीला (Sourav Ganguly) स्थान दिलेलं नाही. गांगुली भारताकडून वनडेत ११ हजारहून अधिक धावा करणारा फलंदाज आहे. तसेच भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे.

Ravi Shastri Names All-Time India-England ODI XI
IND vs ENG: "१२ हजार धावा अन् लोकांची फौज..." अश्विनने सांगितलं रोहित-विराटला संघातून न काढण्याचं खरं कारण
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com