SHASTRI, PONTING BACK ABHISHEK SHARMA IN INDIA PLAYING XI
esakal
Ravi Shastri, Ricky Ponting advice on Abhishek Sharma form : भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ५ मार्च रोजी इंग्लंडचा सामना करणार आहे. इंग्लंडची यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरी उल्लेखनीय झाली आहे. त्यांनी यजमान श्रीलंकेला पराभूत करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यामुळेच भारताला वाटते तितकी ही लढत सोपी नक्कीच नसणार आहे. भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा हा त्याच्या खराब फॉर्माशी झगडतोय आणि त्याच्यावर आता टीकाही होत आहे. अशा परिस्थितीत भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांनी सूर्यकुमार यादव याला एक सल्ला दिला आहे.