Ravi Shastri : अर्धी दाढी कधीच करायची नसते ; शास्त्री

रवी शास्त्री यांचे विचार नेहमीच एकदम सडेतोड असतात. रांची कसोटीबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अर्धी दाढी कधीच करायची नसते.
Ravi Shastri
Ravi Shastrisakal

रांची : रवी शास्त्री यांचे विचार नेहमीच एकदम सडेतोड असतात. रांची कसोटीबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अर्धी दाढी कधीच करायची नसते. मला वाटते की भारतीय संघ २-१ आघाडीवर असताना आणि जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीचा इंग्लंडच्या फलंदाजांनी धसका घेतलेला असताना त्याला नेमकी चौथ्या कसोटीत विश्रांती का दिली, हे मला समजत नाही.

जिमी अँडरसनचे बघा... वयाच्या ४२व्या वर्षी तो सलग तिसरा कसोटी सामना खेळायला तयार झाला. मी प्रशिक्षक असतो, तर बुमराला रांची सामन्यात विश्रांती घेऊ दिली नसती. काम अर्धवट झाले असताना म्हणजे मालिकेतला विजय पक्का झाला नसताना मी त्याला सोडले नसते. शेपटाने दिला फटका आकाशदीपने केलेल्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंड संघाची एका क्षणाची अवस्था ५ बाद ११२ होती.

Ravi Shastri
Ind vs Eng Test Cricket : रूटच्या शतकाने इंग्लंडला सावरले ; रांचीच्या खेळपट्टीने वेगळेच रंग दाखवले

इंग्लंडचा डाव लवकर गुंडाळण्याची स्वप्ने भारतीय संघाला पडू लागली असताना ज्यो रूटने मान खाली घालून फलंदाजी चालू करत एका बाजूने जणू नांगर टाकला. त्याला बेन फोक्स् आणि रॉबिन्सनने झकास साथ दिली आणि इंग्लंडने ३५३ धावांचा फलक उभारून दाखवला. इंग्लंडच्या शेपटाने चांगलाच फटका दिला जेव्हा रूटने फोक्स् आणि रॉबिन्सनसोबत शतकी भागीदारी रचली. रूट एका बाजूने शतकी खेळी करून नाबाद राहिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com