RR vs CSK: सिक्स मारल्यानंतरही शिवम दुबेला कसं केलं आऊट? रवींद्र जडेजा म्हणाला, 'त्याला नेट्समध्ये गोलंदाजी केलीये, माहित होतं तो...'

Ravindra Jadeja on Shivam Dube Wicket: आयपीएल २०२६ स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत मोहिमेची सुरुवात केली. या सामन्यात रवींद्र जडेजाची राजस्थानसाठी चांगली गोलंदाजी झाली. त्याने शिवम दुबेला कसं बाद केलं, याचा खुलासा केला आहे.
Ravindra Jadeja on Shivam Dube Wicket | RR vs CSK | IPL 2026

Ravindra Jadeja on Shivam Dube Wicket | RR vs CSK | IPL 2026

Sakal

Updated on

RR vs CSK Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात पराभवाने झाली आहे. सोमवारी (३० मार्च) गुवाहाटीत झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने ८ विकेट्सने चेन्नईला पराभूत केले.

राजस्थानच्या या विजयात वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) स्फोटक अर्धशतक करत मोलाचा वाटा उचलला. पण त्याआधी राजस्थानसाठी (Rajasthan Royals) गोलंदाजांनी महत्त्वाची कामगिरी बजावली.

राजस्थानच्या सर्व ६ गोलंदाजांनी विकेट्स घेत चेन्नईला १२७ धावांवरच रोखलं होतं. चेन्नईतून १७ वर्षांनंतर राजस्थानसाठी घरवापसी करणाऱ्या रवींद्र जडेजाचाही (Ravindra Jadeja) विजयात महत्त्वाचे योगदान राहिले. त्याने सर्फराज खान आणि शिवम दुबे या दोघांच्या विकेट्स घेतल्या. त्याने १८ धावांत २ विकेट्स घेतल्या.

<div class="paragraphs"><p>Ravindra Jadeja on Shivam Dube Wicket | RR vs CSK | IPL 2026</p></div>
IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com