

Pakistan fast bowler Razaullah celebrates Joe Root wicket on Test debut
Sakal
England vs Pakistan 3rd Test : पाकिस्तानचा क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून पहिल्या दोन कसोटी सामन्यात त्यांना सपाटून मार खावा लागला. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अत्यंत कठीण पावलं उचलली आणि मुख्य प्रशिक्षक सर्फराज अहमदसह ७ खेळाडूंना संघातूनच बाहेर केले.
या ७ खेळाडूंऐवजी नव्या खेळाडूंची संघात निवड करण्यात आली, त्यातील पाच खेळाडू तर अनकॅप्ड होते. याच ५ खेळाडूंमध्ये २१ वर्षांचा रझाउल्लाह (Razaullah) देखील आहे. त्याने ९ सप्टेंबरपासून एजबस्टनला सुरू झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतून पदार्पण केले आणि पदार्पणातच आपलं नाणं खणखणीत वाजवलं.